आवाहन …

“सिंधु संस्कृती आणि महाराष्ट्र”
हे पुस्तक आहे एकदम न्यारं …
चक्क सिंधु नदी काठच्या प्राचीन संस्कृतीवर
ते मराठी माणसांचा हक्क सांगतयं बरं !

व्याकरणकार ‘वररूची’ आणि बृहत कथाकार ‘गुणाढ्य’
यांच्या आठवणींना करतंय साकार …
पातंजली मुनींच्या योग सुत्रांतून महाराष्ट्री संस्कारांना देतंय आकार !

भावई, भवानी आणि भैरवांच्या अधिपत्याखालील उत्तरेला गेलेले वीरं …
ज्यांनी महीच्या ऋत आणि गावाच्या रहाटीतून केला मराठी मनांचा आविष्कार !

आर्य प्रभूला पसंत भूभागावर महाआर्य आखत जाई गांव अन होई दांडेकर …
मग तिथे राऊळ, घाडी आणि मराठा राजसत्तेच्या बारा कुळांचा सुरू होतसे व्यापार !

व्यापारातून आलेला भागातून राऊळ आणि घाडी यांच्या योजनांना भंडारी देई आकार …
अश्विनी कुमार राऊत नासत्य आणि दस्र बनून
या समृद्ध जीवन शैलीचा करत होते जगभर प्रचार !

या सप्तर्षींच्या पदस्पर्शाने पावन भारत भूमीत आकाराला आली योजनाबध्द शहरं …
बिऱ्हाडातील शेती, पशुपालन, कलाकुसरीचे विविध व्यवसाय यांतील सहकार्याने धरला जोर !

यांतून उभ्या ‘सिंधु संस्कृती’ ची कहाणी थोर …
वाचा मराठी जन हो,
पुनः बनण्या जगाचे अनभिषिक्त वीर !

“मल्हारी मार्तंड, जय मल्हार”

“येळकोट येळकोट, जय मल्हार”

Comments

Leave a Reply

Discover more from Swastika Dharma

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading